loader
Breaking News
Breaking News
Foto

"श्रद्धा आणि परंपरेचा अनोखा संगम..!"गुहागर तालुक्यातील तळवलीत 'वाघबारस' उत्साहात साजरी

आबलोली (संदेश कदम) - पाळीव जनावरांचे वाघ आणि बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांपासून रक्षण व्हावे, या श्रद्धेपोटी गुहागर तालुक्यातील तळवली गावात पारंपरिक 'वाघबारस' हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोकणात भातकापणी पूर्ण झाल्यानंतर गावातील गुरांना चरण्यासाठी मोकळे सोडले जाते. मात्र, जंगलात वाघ आणि बिबट्याचा वावर असल्याने या जनावरांच्या जीविताला धोका निर्माण होतो. हे संकट टाळण्यासाठी दरवर्षी कार्तिक एकादशी च्या दुसऱ्या दिवशी 'वाघबारस' साजरी करण्याची जुनी परंपरा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सणाच्या दिवशी लहान मुले आणि तरुणांकडून गावातून तांदूळ व पैसे गोळा केले जातात. त्यानंतर गावाबाहेरील जंगलात एका ठरलेल्या ठिकाणी एकत्र येऊन निसर्गाची आणि वाघोबाची विधिवत पूजा केली जाते. यावेळी काही मुले अंगावर पट्टे ओढून 'वाघ-वाघिणीचे' रूप घेतात आणि त्यांना पारंपरिक पद्धतीने पिटाळून लावले जाते. तसेच, जवळच्या नदी-नाल्यांतील खेकडे आणि मासे पकडून सामूहिक जेवणाचा आस्वाद घेतला जातो. असे केल्याने वाघोबा शांत होतो आणि वर्षभर पाळीव प्राण्यांचे रक्षण होते, अशी येथील ग्रामस्थांची गाढ श्रद्धा आहे. यंदाही तळवलीतील आगरवाडी, भैरववाडी आणि डावलवाडी येथील आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होत हा पारंपरिक आनंद लुटला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg