loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड जिल्ह्यातील क्रांतीभूमीतील आंबेडकरी चळवळीचा निष्ठावंत भिमसैनिक हरपला

साई माणगांव (हरेश मोरे) - आंबेडकरी विचारांचा एक निडर-निर्भीड कार्यकर्ता, आंबेडकरी घराण्याचा एक निष्ठावंत भिमसैनिक विजय जाधव यांचे ५ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वा. हृदय विकाराने अकस्मात निधन झाले. तळा तालुका ते रायगड जिल्हा असा त्यांच्या जिवनाचा उभरता आलेख सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील एक उत्तम वक्ता, आंबेडकरी चळवळीसाठी नोकरी सोडून समाजासाठी गावी स्थायीक होणारे लढवय्ये व्यक्तिमत्व, तळा तालुका बौद्धजन सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय बौद्ध तळा तालुक्यांचे अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संपुर्ण तळा तालुका पिंजून काढून आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी विचारधारा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून घराघरात पोहचवण्याचे अमुल्य कार्य विजय जाधवांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर पुढे भारतीय बौद्ध महासभेचे रायगड जिल्हा अध्यक्षपदी असताना रायगड जिल्हात देखील धम्मचळवळ शिखरावर नेण्याचे कार्य त्यांनी केले. राजकीय क्षेत्रात भारीप बहुजन महासंघांचा एक कार्यकर्ता ते वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष या प्रवासात संपुर्ण रायगड जिल्हात आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचे काम तळागाळातील लोकापर्यत नेटाने पोहचवले व वंचित बहुजन आघाडीची भूमिका ठोसपणे मांडण्याचे कार्य केले, समाजाचा कोणाताही प्रश्न असो, समस्या असो किंवा कोणाचे सुख - दुःख असो, विजय जाधव हे त्याठिकाणी ठामपणे उभे राहून सहकार्य करणार, असे खंबीर नेतृत्व हरपले असून तळा व माणगांव तालुक्यात शोककला पसरली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg