loader
Breaking News
Breaking News
Foto

गावणवाडी (कोतवडे) ग्रामस्थांनी श्रमदानातून साकारला बंधारा !

कोतवडे - राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे गावातील गावणवाडी ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधारा बांधला आहे. वाडीतील युवक, महिला आणि पुरुष यांनी २३ नोव्हेंबर या दिवशी दिवसभर कष्ट घेऊन बंधार्‍याचे काम पूर्ण केले. गावातून वहाणार्‍या कुसुम नदीवर हा बंधारा बांधण्यात आला आहे. बंधारा बांधण्यासाठी यंत्रसामग्री आणि पोती आदी साहित्य कोतवडे ग्रुप ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करून देण्यात आली. गावात अन्य वाड्यांमधील ग्रामस्थांनीही या नदीवर बंधारे बांधले आहेत. दुष्काळग्रस्त स्थितीत या बंधार्‍यांत साठणारे पाणी ग्रामस्थांसाठी मोठे उपयोगी ठरणारे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg