loader
Breaking News
Breaking News
Foto

वनराई बंधारा मोहोत्सवात घोटगेवाडी येथे ५ बंधारे यशस्वीरीत्या पूर्ण

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग पंचायत समिती, दोडामार्ग, आणि ग्रामपंचायत घोटगेवाडी यांच्या वतीने आयोजित ’वनराई बंधारा मोहोत्सव’ अंतर्गत गावात ५ वनराई बंधारे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. यामध्ये घोटगेवाडी ग्रामस्थ, महिला भगिनी, कुंभारखण दाळोबा देवस्थान ओढ्यावर आणि रमेश सातार्डेकर यांच्या शेताकडे (शेतवड)- २ बंधारे, किर्ती विद्यालय घोटगेवाडी, अनंत पत्कि यांच्या शेताकडे- २ बंधारे, पुर्ण प्राथमिक शाळा घोटगेवाडी शिक्षक पालक यांनी कुंभारखण, दाळोबा देवस्थान येथील आओढ्यावर-१ बंधारा असे एकूण पाच बंधारे यशस्वीरित्या पुर्ण केले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात श्रमदान केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम अधिकारी, ग्राम कर्मचारी, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी, कृषी सहाय्यक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका, पालक, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाळ्यानंतर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, शेतीला व गावाला बारमाही पाणी मिळावे या उद्देशाने हे बंधारे बांधण्यात आले आहेत. सर्व मान्यवरांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg