loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम

खेड - बालकांचे संरक्षण, त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्येक बालकाला सुरक्षित व भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेड येथे सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर 2026 रोजी ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत Pan India School Awareness Programme चे आयोजन करण्यात आले. इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या विशेष जनजागृती सत्राला दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी खेड येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश जी. डी. पाटील, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख तथा उपप्राचार्य राहुल गाडबैल, उपप्राचार्य शैलेश देवळेकर व तेजश्री कानडे, समन्वयक देवयानी महाजन व प्रितम वडके आणि शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. तसेच न्यायालयीन कर्मचारी ए. एस. कांबळे आणि श्रेयस लाकडे हे देखील उपस्थित होते. मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमादरम्यान खेड येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, 2012 अर्थात पोक्सो (POCSO) कायदा, बालकांचे कायदेशीर अधिकार, बालसुरक्षा आणि लैंगिक शोषणापासून संरक्षण या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. स्वतःच्या हक्कांची जाणीव ठेवणे, अयोग्य वर्तन ओळखणे, स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहणे आणि कोणत्याही अनुचित प्रसंगी न घाबरता विश्वासू व्यक्तीकडून मदत मागणे यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनीही ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून बालसुरक्षा, बालहक्क आणि सुरक्षित वातावरणाचे महत्त्व विशद केले. कोणत्याही अयोग्य प्रसंगाला सामोरे जावे लागल्यास घाबरून न जाता पालक, शिक्षक किंवा अन्य विश्वासू व्यक्तीशी संवाद साधावा आणि आवश्यक ती मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. बालकांना सुरक्षित, आनंदी आणि निर्भय वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

टाईम्स स्पेशल

‘हर बच्चे का बचपन हमारी जिम्मेदारी’ — प्रत्येक बालकाचे बालपण सुरक्षित ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.' हा संदेश या अभियानाच्या माध्यमातून प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. बालकांचे हक्क जपणे, त्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे धैर्य देणे आणि त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही केवळ पालकांची किंवा शाळेचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. याच उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये बालसुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना स्वतःच्या अधिकारांची जाणीव करून देणे यावर भर देण्यात आला. या जनजागृती सत्रामुळे विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्यांतर्गत असलेल्या संरक्षणात्मक तरतुदी, बालकांचे अधिकार आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. ‘जागरूक विद्यार्थी, सुरक्षित बालपण!’ हा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब राऊत यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg