रत्नागिरी (जमीर खलफे) - दिवाळीसह आगामी सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या सावटाखाली खुल्या बाजारात किराणा साहित्याची चढ्या दराने विक्री होत असून, ग्राहकांची होणारी ही आर्थिक लूट रोखण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे. सणांसाठी लागणारे तेल, साखर, रवा, मैदा आणि बेसन यासारख्या वस्तू रास्त धान्य दुकानांमार्फत वाजवी दरात उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीचे निवेदन ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना सादर केले.
कोकण विभाग हा तेल, कडधान्ये, मैदा, रवा आणि बेसन यांसारख्या बहुतांश अन्नधान्यांसाठी इतर बाजारपेठांवर पूर्णपणे अवलंबून आहे. स्थानिक पातळीवर या वस्तूंचे पुरेसे उत्पादन होत नसल्यामुळे सणासुदीच्या काळात येथील ग्राहकांना खुल्या बाजारातून चढ्या भावाने खरेदी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. सणांच्या पार्श्वभूमीवर खाजगी व्यापार्यांकडून डाळी, साखर आणि खाद्यतेलाचे दर सातत्याने वाढवले जात असल्याने सर्वसामान्यांचे सणांचे बजेट कोलमडले आहे. या जीवनावश्यक वस्तूंच्या मनमानी दरवाढीवर शासनाचे कोणतेही थेट नियंत्रण उरलेले नाही.
या पार्श्वभूमीवर शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांना दिलासा देण्यासाठी शासकीय धान्य दुकानांमधून सणासुदीचे साहित्य सवलतीच्या दरात पुरवण्याची तजवीज करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन सादर करतेवेळी ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष संजय वैशंपायन, खजिनदार अनंत भडकमकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ग्राहक पंचायतीने सणांच्या काळात ऐन मोक्यावर ग्राहकांच्या जिव्हाळ्याच्या आणि खिशाशी निगडित प्रश्नाला हात घातल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून या भूमिकेचे जोरदार स्वागत केले जात आहे.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.