loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये विजयादशमीनिमित्त रावण दहन सोहळा उत्साहात

खेड, रत्नागिरी - विजयादशमीचे औचित्य साधून खेड येथे रावण दहन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रोटरी क्लब खेड आणि रोटरॅक्ट क्लब खेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने खेड येथील ऐतिहासिक गोळीबार मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास खेडच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

'सत्याचा असत्यावर विजय' हा संदेश देत या रावण दहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य तसेच खेड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रावण दहनानंतर उपस्थितांनी एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्षा बुटाला यांनी सर्व खेड वासियांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.या सोहळ्यामुळे संपूर्ण खेड शहरात विजयादशमीचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg