loader
Breaking News
Breaking News
Foto

एलटीटी स्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ

खेड : तालुक्यातील खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेड या प्रशालेत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या खेळातील विविध कौशल्यांचा विकास करून त्यांनी या क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी याकरिता प्रवृत्त करणे, या उद्देशाने प्रशालेचे नवीन मैदान शिवतर रोड - भडगांव येथे दि.२६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत 'वार्षिक क्रीडा महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवाचा शुभारंभ करताना जयेश गुहागरकर यांच्या शुभहस्ते क्रीडा ध्वज फडकवून, माजिद खतीब यांच्या हस्ते मशाल ज्योत प्रज्वलित करून तसेच श्रीफळ वाढवून अत्यंत जल्लोषात करण्यात आला. मुख्याध्यापक सारंग यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मान्यवरांनी 'गोळा फेक' या क्रीडा प्रकाराचा आनंदही घेतला. यावेळी समन्वयक सेबास्टियन जॉय, समन्वयिका एल्सी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर, पालक - शिक्षक संघाचे पदाधिकारी, पालक आदी मान्यवर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी लीडर मार्चपास व एम सी सी मार्चपास विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करत क्रीडा ध्वजाला मानवंदना दिली. प्रशालेतील लेझीम पथकाने 'शिवनेरीवर शिवबा जन्मला' या गाण्याच्या तालावर बहारदार नृत्याविष्कार सादर केला. तसेच प्रामाणिकपणा, शिस्त व खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी सर्व खेळाडूंना क्रीडा शपथही देण्यात आली. याप्रसंगी जॉय यांनी आपल्या मनोगतातून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळ अत्यंत गरजेचे असून खेळातून चिकाटी, शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात, असे प्रतिपादन करताना सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, प्रेमळ चिखले, चंद्रकिरण वैद्य, डॉ. पुष्कर नेने, विलीन पाटणे यांनी क्रीडा स्पर्धेकरिता सर्वांना भरभरून शुभेच्छा दिल्या. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या स्तरामध्ये होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, १०० मी व २०० मी धावणे अशा वैयक्तिक व कबड्डी, खो - खो, व्हॉलीबॉल, डॉजबॉल, टग ऑफ ऑर, क्रिकेट, रिले या सांघिक खेळांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंचे रेड, ग्रीन, यलो, ब्ल्यू असे गट पाडण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आफरीन कौचाली यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg