loader
Breaking News
Breaking News
Foto

ढगाळ वातावरणामुळे तापमानात मोठे विचलन; आंबा-काजू बागायतदारांना सतर्कतेचा इशारा

सावंतवाडी : कोकण आणि गोवा परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ किमी उंचीवर कार्यरत असलेल्या चक्राकार वाऱ्यांची (सायक्लोनिक सर्क्युलेशन) तीव्रता कमी झाली असली, तरी ईशान्य मान्सून वाऱ्यांच्या तीव्र झोतामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणावर ढगांची दाटी निर्माण झाली आहे. या ढगाळ वातावरणाचा तापमानावर मोठा परिणाम झाला असून तापमानात तब्बल १३ वरून १९ अंश सेल्सीअसपर्यंत म्हणजेच सुमारे ६ अंश सेल्सीअसचे विचलन नोंदवले गेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आंबा आणि काजू पिकांवर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने बागायतदारांनी जागरूक राहावे, असे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे यांच्या वतीने करण्यात आले आहे. ​बदलत्या हवामानामुळे फळबागांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकरी व बागायतदारांनी वेळोवेळी कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक सल्ल्याचे अवलोकन करून त्यानुसार योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असेही ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे यांनी स्पष्ट केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg