loader
Breaking News
Breaking News
Foto

पुणे येथील सोहळ्यात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार श्री प्रफुल्ल देसाई यांना प्रदान

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रफुल्ल वसंत देसाई यांना पुणे येथे सी. एफ. टी. यु.आय संलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार पदवीधर मतदार संघांचे आमदार प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला. पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी संस्थेतर्फे राज्यातील विविध भागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण येथील भंडारी हायस्कुल मध्ये गेली ३० वर्षे ग्रंथपाल म्हणून ग्रंथसेवा आणि शिक्षणसेवा देणाऱ्या प्रफुल्ल देसाई यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार या समारंभात बहाल करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ .प्रतापसिंह पाटील , राज्याचे महीला कल्याण आयुक्त सुनिता ओव्हाळ, एच. डब्ल्यू. पी. एल.मुंबईच्या नियती गांधी, बार्टीच्या सुचेता शिंदे , एच. डब्ल्यू. पी. एल.मुंबईचे अगस्तीन फर्नांडीस गायक श्री पंडित राजगुरू, शितल जानराव, शिक्षकेतर विभाग प्रदेशाध्यक्ष सुरेश रोकडे, शिक्षकेतर विभाग प्रदेश सचिव चंद्रशेखर सावंत, राज्य समन्वयक आणि खजिनदार संजय बनसोडे, राज्य संघटक सतीश साठे आणि अशोक मोरे आदी उपस्थितीत होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी आमदार प्रतापसिंह पाटील यांनी मार्गदर्शन करताना आज ग्रामीण भागात शिक्षण घेताना अनेक अडचणीचा सामान करावा लागत आहे. शिक्षकांचा पेन्शनचा प्रश्न महत्वाचा बनला आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना करत असलेले कार्य महत्वपूर्ण आहे. या कार्याला सहकार्य करत आमदार म्हणून आपण शिक्षण विषयक हे सर्व प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडून सोडविण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. शेवटी सोमनाथ शिंदे यानी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg