loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार वैध, तीन अवैध

खेड (वार्ताहर) : - येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीचे प्राथमिक चित्र समोर आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ५ अर्ज वैध ठरले असून ३ अर्ज अवैध ठरले आहेत. नगराध्यक्षपदासाठीचा शिवसेनेच्या माधवी राजेश बुटाला यांचा एक अर्ज वैध व एक अर्ज अवैध ठरला आहे. भाजपच्या वैभवी वैभव खेडेकर यांचा अर्ज अवैध ठरला असला तरी त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला आहे. तसेच उबाठाच्या सपना ऋषिकेश कानडे यांचा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे माधवी राजेश बुटाला., वैभवी वैभव खेडेकर आणि सपना ऋषिकेश कानडे या तिघींमध्ये नगराध्यक्ष पदासाठी खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, खेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 नगरसेवक पदासाठी एकूण ८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर १७ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे ६५ उमेदवारांचे अर्ज वैध मान्य झाले असून हे सर्व उमेदवार आता नगरसेवक पदासाठीच्या निवडणूक रिंगणात राहणार आहेत. अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे = कौसर बशीर मुजावर यांचा नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज अवैध ठरला असला तरी नगरसेवक पदासाठीचा अर्ज वैध ठरला आहे. प्रभाग क्र.१ अ मधील भाजपच्या आशा अनिल सनगरे यांचा १ अर्ज वैध व १ अर्ज अवैध , प्रभाग १ ब मधील भाजपच्या संदेश शिवराम भुवड यांचा १ अर्ज वैध व १ अर्ज अवैध , प्रभाग २ ब मधील शिवसेनेच्या मोहम्मद अमीन पालेकर , प्रभाग ३ अ मधील भाजपच्या प्रेरणा प्रकाश देसाई, ३ ब मधील भाजपचे मिलिंद रविंद्र नांदगावकर, प्रभाग ४ ब मधील शिवसेनेचे तौसिफ खोत, इम्तियाज खोत व काँग्रेसचे अब्दुल बासित सुर्वे , प्रभाग ५ अ मधील भाजपचे सुरेश नारायण खेडेकर, प्रभाग ६ अ मधील नेहा विजय पवार, प्रभाग६ ब मधील भाजपचे संदीप नारायण सासणे यांचे दोन्ही अर्ज अवैध, प्रभाग ७ अ मधील वसंत बळीराम पिंपळकर, प्रभाग ८ ब मधील भाजपच्या प्रिती स्वरूप माजलेकर यांचा १ अर्ज वैध व १ अर्ज अवैध, प्रभाग ८ ब मधील शिवसेनेच्या संजना संजय कुडाळकर यांचा १ अर्ज वैध व १ अर्ज अवैध, प्रभाग ९ अ मधील भाजपच्या अनाम नईम चौघुले यांचा १ अर्ज वैध व १ अर्ज अवैध, प्रभाग ९ ब मधील भाजपचे भालचंद्र रविंद्र दळवी यांचा १ अर्ज वैध व १ अर्ज अवैध, भाजपाचे वैजेश रघुनाथ सागवेकर यांचा १ अर्ज वैध व १ अर्ज अवैध अशी अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे असून शिवसेनेच्या भूषण शांताराम चिखले यांच्या अर्जाला आक्षेप/ हरकत घेण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

आता २१ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने अंतिम स्पर्धेचे चित्र त्या दिवशी निश्चित होईल. काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता असल्याने सध्या दिसत असलेल्या रिंगणात आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे समोर आले असून नगराध्यक्ष पदासाठी पाच आणि नगरसेवक पदासाठी ६५ उमेदवारांमध्ये रंगतदार लढत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये खेड नगरपरिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg