loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्राहकसेवेला प्राधान्य देत आशिष नागतोडे यांची उल्लेखनीय कामगिरी

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : बँक ऑफ इंडिया, कसबा शाखेचे शाखाधिकारी आशिष नागतोडे हे ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करत आहेत. बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची समस्या समजून घेत, त्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी ते स्वतः लक्ष देत आहेत. ग्राहकांच्या विविध अडचणी, बँकिंगविषयक प्रश्न तसेच आवश्यक सेवांबाबत मार्गदर्शन करताना नागतोडे हे आपल्या टीमसोबत समन्वयाने काम करतात. ग्राहकांची समस्या केवळ ऐकून न घेता ती शक्य तितक्या लवकर सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यामुळे ग्राहकांना बँकेच्या सेवा अधिक सुलभ आणि विश्वासार्ह पद्धतीने मिळण्यास मदत होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘ग्राहकांचे समाधान हीच खरी सेवा’ या भावनेतून काम करणारे आशिष नागतोडे हे आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन शाखेच्या कामकाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर देत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ग्राहकांमध्ये समाधानाची भावना निर्माण होत असून, बँक आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होत आहे. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन तत्पर सेवा देण्याची त्यांची कार्यशैली आणि टीमला सोबत घेऊन काम करण्याची हातोटी यामुळे बँक ऑफ इंडिया, कसबा शाखेच्या कामकाजाला निश्चितच नवी दिशा मिळत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg