loader
Breaking News
Breaking News
Foto

सुरळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये नवीन विद्युत ट्रान्सफार्मरचे उद्घाटन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील सुरळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये नवीन विद्युत ट्रान्सफार्मरचे उद्घाटन करण्यात आले. सुरळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये सुमारे ४० वर्षापूर्वी वीज पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर बसविण्यात आला होता, जुन्या सर्व्हेनुसार तो बरोबर होता, परंतु गावामध्ये विजेच्या वापरात वाढ झाल्याने सध्याच्या परिस्थितीचा विचार करून नवीन ट्रांसफार्मर गरजेचा होता, गावातील ग्रामस्थांनी या संदर्भात पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांना माहिती दिली होती. सभापतीनी त्वरित दखल घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा केली, याबाबत सतत पाठपुरावा करून नवीन ट्रान्सफार्मरची मंजुरी घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरळ गावात वीज पुरवठा कमी दाबाने होत असल्याने गावातील ग्रामस्थांचे घरगुती विद्युत उपकरणे यांना धोका निर्माण होत होता, ग्रामस्थांना विद्युत पुरवठाबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते, त्या अनुषंगाने सुरळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी विद्युत पुरवठा ट्रान्सफर नवीन व ज्यादा वीज पुरवठा करणारा बसवून मिळावा अशी मागणी ग्रामस्थ रवींद्र पांडुरंग आग्रे, रिजवान जब्बार पालटे व ग्रामस्थांनी गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांच्याकडे केल्यानंतर लगेच सभापती प्रणव पोळेकर यांनी उपकार्यकारी अभियंता महावितरण गुहागर यांना पत्र दिले, तदनंतर लगेचच या ठिकाणी वीज पुरवठा ट्रान्सफार्मर बसवण्यात आला. या वीज ट्रान्सफार्मरच्या उद्घाटन प्रसंगी गावातील सर्व ग्रामस्थ, महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg