loader
Breaking News
Breaking News
Foto

शाळा कुणकेरी नं. 3 चे बुलबुल पथक राज्यस्तरावर चमकले

कुणकेरी - जि. प. प्राथमिक शाळा कुणकेरी नं.3 च्या बुलबुल पथकाने दमदार कामगिरी करत राज्यस्तरीय यश प्राप्त केले. मार्च 2026 मध्ये सोनतळी कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बुलबुल राज्य पुरस्कार चाचणी परिक्षेत शाळेच्या ताराराणी बुलबुल पथकाने चमकदार कामगिरी करत सर्व विद्यार्थी राज्यस्तरीय बुलबुल पुरस्कारास पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे या पथकाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राज्यस्तरावर प्रतिनिधित्व केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या शाळेचे एकमेव बुलबुल पथक राज्यस्तरीय परिक्षेसाठी सहभागी झाले होते. या पथकातील इयत्ता तिसरी व चौथीच्या चिमुकल्या बुलबुलनी हे राज्यसरीय यश प्राप्त करून सर्व विद्यार्थी कौतुकास पात्र ठरले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेच्या प्लॉक लिडर निता नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदी विश्राम सावंत, निष्ठा उत्तम सावंत, लावण्या अनिल धुरी, रिशिता राजाराम धुरी, ध्रुवी नागेश सावंत, सई तानाजी सावंत, त्रिशा तेजस गावडे, प्रिया शंकर राणे, समृद्धी सचिन चव्हाण या विद्यार्थ्यांनी हे राज्यस्तरीय यश प्राप्त केले. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मिंगेल मान्येकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कब मास्टर नितीन नामदेव सावंत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेच्या या राज्यस्तरीय यशाबद्दल कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप निऊंगरे, शा व्य समितीचे अध्यक्ष विनया सावंत, आंबेगाव शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप म्हाडगुत, कुणकेरी गावचे सरपंच सोनिया सावंत तसेच सर्व पालक, ग्रामस्थ यांनी शाळेच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg