देवगड (प्रतिनिधी) - देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे आज, सोमवार दि. २४ ऑगस्ट रोजी श्रावणातील दुसऱ्या सोमवारी पहाटे ५ वाजल्यापासून भगवान श्री कुणकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने गजबजून गेला. यादिवशी प्रथम पूजेचा मान माजी आमदार वैभव नाईक, कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, उद्योजक अतुल रावराणे, उद्योजक संजय आंग्रे तसेच शिवभक्त व समाजसेवक संजय बावधनकर (राजापूर) यांना देण्यात आला. यावेळी मान्यवरांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने मानसन्मान करण्यात आला.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, उपाध्यक्ष गणेश वाळके, सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर यांच्यासह ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांचीही उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजापूर मित्र मंडळाच्या वतीने संजय बावधनकर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली पदयात्रा कुणकेश्वर येथे दाखल झाली. या पदयात्रेत सुमारे २०० शिवभक्त सहभागी झाले. दरम्यान, सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत कोकण व मुंबई प्रांतातील प्रसिद्ध भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये भजनी बुवा श्रीधर मुणगेकर, भगवान लोकरे, रामदास कासले, प्रमोद हर्याण तसेच रायगड येथील बुवा महादेव शहाबाजकर यांच्यासह विविध भजनी मंडळींची सेवा लाभणार आहे.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविकांसाठी साबुदाणा खिचडी व शेंगदाणा उसळीचा प्रसाद वाटप करण्यात येत आहे. यासाठी विठ्ठल फणसेकर, भाई नरे, दीपक हिर्लेकर, गोपाळ वाळके यांच्यासह दानशूर देणगीदारांचे सहकार्य देवस्थान ट्रस्टला लाभले आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था, प्रसाद वाटप आणि इतर आवश्यक सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. श्रावणी सोमवारनिमित्त दिवसभर कुणकेश्वर मंदिर परिसरात हर हर महादेवच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

















































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.