साटेली भेडशी, (प्रतिनिधी) - साटेली-भेडशी उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्याविरोधात सरपंच यांच्यासह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार राहुल गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर झाला. उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर होण्याची या ग्रामपंचायतमधील पहिलीच वेळ आहे. दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून साटेली-भेडशी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. राजकियदृष्ट्या या ग्रामपंचायतीचे महत्व फार मोठे असून अकरा सदस्य असलेली ही ग्रामपंचायत स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी नेहमीच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे संवेदनशीलरित्या पाहिले जाते.
मागील आठवड्यात उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केल्याने ही ग्रामपंचायत पुन्हा चर्चेत आली होती. याबाबतची कार्यवाही सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार राहुल गुरव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. या सभेत चर्चा व मतदान प्रकिया पार पाडली. यावेळी अविश्वास दाखल केलेल्या सरपंच यांच्यासह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्या अविश्वास होण्याच्या बाजूने हात उंचावून मतदान करीत अविश्वास ठराव मंजूर झाला. तर या विशेष सभेस उपसरपंच सुमन डिंगणेकर, सदस्य इस्माईल चांद, राजन सावंत हे तिघे अनुपस्थित राहिले. सरपंच छाया सखाराम धर्णे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मयेकर, विष्णू सुतार, सेजल धर्णे, दिपाली मोरजकर, शोभना जुवेकर, संपदा गवस, नीलपर्णा पार्सेकर, गणपत डांगी हे उपस्थित राहत अविश्वासाच्या बाजूने मतदान केले.
या विशेष सभेसाठी ग्रामविकास अधिकारी ज्योती डोंगरदिवे, तलाठी स्मिता परब, महसूल कर्मचारी स्वप्नील देसाई आदी उपस्थित होते.ङ्ग हा अविश्वास ठराव मंजूर होऊ नये यासाठी काही राजकीय मंडळी यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. काही मंञीमहोदय तसेच राजकीय नेते मंडळी पर्यंत प्रकरण गेले होते. पण सरपंच सदस्य सुनावणी दरम्यान ठाम राहिले यामुळे ठराव मंजूर झाला. उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर होणे ही पहिली घटना आहे. साटेली भेडशी तसेच दोडामार्ग तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

















































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.