loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी येथे बलेनोची ट्रेलरला धडक; दोघे गंभीर जखमी

रायगड - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सुकेळी गावच्या हद्दीत जिंदाल कंपनीसमोर सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून बलेनो कारने जोरदार धडक दिल्याने कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, चालक जयदीप दीपक महाडिक (वय ३६, रा. बोरीचा माळ, ता. तळा, जि. रायगड) हे मारुती सुझुकी बलेनो (एमएच ०५ एफपी ६२५५) मधून मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होते. पहाटे सुमारे ५.३० वाजता सुकेळी येथील जिंदाल कंपनीसमोर कार आली असता, त्याच दिशेने जाणारा टाटा कंपनीचा ट्रेलर (एमएच ४६ सीएल ६३४९) रस्त्यावर उभा होता. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने बलेनोची ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात जयदीप महाडिक तसेच कारच्या डाव्या बाजूला बसलेले स्वप्निल सुरेश साळुंखे (वय ३२, रा. इंदापूर-माणगाव) यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.

टाईम्स स्पेशल

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र वाकणचे एएसआय भानुदास म्हात्रे, पोलिस कॉन्स्टेबल सत्यवान पिंगळे, मनोहर माळी व राजू पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागोठणे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र पारखे, पोलिस हवालदार महेश रूईकर, प्रशांत घरत, प्रशांत भोईर व पोलिस कॉन्स्टेबल बळी पुट्टेवाड यांनीही मदतकार्य केले. जखमींना तातडीने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg