loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत 'राजमाता जिजाऊ' ५ नवीन एसटी बसेसचे स्वागत; आमदार दीपक केसरकरांच्या हस्ते लोकार्पण

​सावंतवाडी, (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या 'राजमाता जिजाऊ' श्रेणीतील ५ नवीन अत्याधुनिक एसटी बसेसचे सावंतवाडी बसस्थानकात स्वागत करण्यात आले. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन व श्रीफळ फोडून या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख खेमराज कुडतरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार केसरकर यांनी त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बसफेरीचा शुभारंभ केला. लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि शहरप्रमुख खेमराज कुडतरकर यांनी इतर पदाधिकाऱ्यांसह नवीन बसमधून मोती तलावाच्या काठावर फेरफटका मारला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​याप्रसंगी बोलताना आमदार दीपक केसरकर म्हणाले की, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या सहकार्यातून हे काम पूर्ण झाले आहे. सावंतवाडी मतदारसंघासाठी एकूण २० गाड्या मंजूर करण्यात आल्या असून, त्यातील १० गाड्या सावंतवाडी, ५ गाड्या वेंगुर्ला आणि ५ गाड्या दोडामार्गसाठी देण्यात आल्या आहेत. यातील पहिल्या ५ गाड्यांचे आज आगमन झाले आहे. आगामी गणेशोत्सवात या गाड्यांमुळे प्रवाशांना उत्तम सेवा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सावंतवाडी बसस्थानक परिसरातील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

​या कार्यक्रमाला सभापती सुस्मिता जाधव, स्थानक प्रमुख गौतमी कुबडे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, तालुका प्रमुख बबन राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, राजन रेडकर, गजानन नाटेकर, सुरेंद्र बांदेकर, राजू कुबल, हर्षद डेरे, सत्यवान बांदेकर, क्लेटस फर्नांडिस, हेमंत बांदेकर, संदेश सोनुर्लेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, गुंडू जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg