loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा समाजाच्या वतीने मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांचा भव्य सत्कार

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) जिल्हाध्यक्षपदी कडवई गावचे सुपुत्र जितेंद्र चव्हाण यांची फेरनिवड झाल्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन भव्य सत्कार करण्यात आला. माखजन, करजुवे, धामापूर, मुरडव, आरवली तसेच कडवई, तुरळ, चिखली, मासरंग, तांबेडी, रांगव, शेंनवडे, कुंभरखानी, राजिवळी आदी दोन प्रभागांतील मराठा समाजाच्या वतीने हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मराठा समाजातील विकास सुर्वे, सदानंद ब्रीद, अनिल मोरे, विजय कदम, रामचंद्र निकम, मिलिंद शिंदे, सुभाष ब्रीद, दिलीप सुर्वे, बबन सुर्वे, मुन्ना ब्रीद, अरविंद सुर्वे, राजू ब्रीद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मध्यंतरीच्या काळात जितेंद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत काही काळ पक्षाच्या सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच चव्हाण यांची पुन्हा जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर करून त्यांना पक्षात सक्रिय होण्याचे आदेश दिले.

टाईम्स स्पेशल

चव्हाण यांची फेरनिवड होताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी चव्हाण यांचे उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात येत आहेत. गावागावांत त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजित केले जात असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जितेंद्र चव्हाण यांच्या फेरनिवडीबद्दल सर्वसामान्य नागरिक आणि मनसे समर्थकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg