loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवली तंटामुक्त अध्यक्षपदी प्रकाश चाळके आठ वर्ष बिनविरोध

देवळे - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी प्रकाश चाळके यांची आठव्या वर्षी ही बिनविरोध निवड झाली. चाफवली गावातील जनतेने गेली सात वर्ष प्रकाश चाळके यांना तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवडून दिले होते. तसेच याही वर्षी आठव्या वेळी सुद्धा तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी गावच्या सरपंच आरोही रावण, उपसरपंच विजय घुमे, माजी उपसरपंच सुरेश चाळके, पोलीस पाटील विजय चाळके, ग्रामसेवक प्रवीण माईन, संजय चाळके, विनय चाळके, अनंत दळवी, सदानंद पाटोळे, प्रतीक चाळके, राजाराम लिगम, हरेश केसव, प्रभाकर केसव, राजाराम(बुवा) भालेकर,चंदा कांबळे, राजश्री चाळके हे उपस्थित होते. सर्वांनी एक मुखाने अध्यक्षपदी प्रकाश चाळके यांची बिनविरोध निवड केली.

टाईम्स स्पेशल

कोरोना काळापासून प्रकाश चाळके यांनी गावात चांगले काम केल्याचे ग्रामस्थांनी म्हटले, यापुढेही आपण चांगले काम करू सर्वाना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, तसेच गेली सात वर्ष चाफवली ग्रामस्थांनी, तंटामुक्ति सदस्य, पोलिस पाटिल, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास व केलेले सहकार्य त्यामुळेच आपण चांगले काम करू शकलो. यापुढेही लोकांना योग्य न्याय देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू, असे प्रकाश चाळके यांनी सत्कार प्रसंगी म्हटले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg