सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठीच्या अपक्ष उमेदवार आणि माजी उपनगराध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरात अत्यंत उत्साहाने व जोरदार प्रचार केला. अपक्ष उमेदवार असूनही सावंतवाडीची जनता आपल्या सोबत आहे, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. श्रीमती कोरगावकर यांनी सांगितले की, सावंतवाडीची जनता आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. नागरिक आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाला कंटाळले आहेत. 'रोजगाराच्या केवळ गप्पा' न मारता, तर प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांशी संवाद साधला आणि जोरदार प्रचार केला. या प्रचार दौऱ्यात श्री. आचार्य, ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, व्यंकटेश शेट आदींसह अन्नपूर्णा कोरगावकर यांचे असंख्य समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. जनतेचा मिळत असलेला भरघोस प्रतिसाद अन्नपूर्णा कोरगावकर यांना मिळत आहे असे सांगितले जाते.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.