कणकवली (प्रतिनिधी) - शिवसेना शाखाप्रमुख या पदावर कार्यरत असताना महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. ही कृती पक्षाच्या धोरणाविरोधात असून ती घोर पक्षशिस्तभंग करणारी आहे. त्यामुळे नागवे शिवसेना शाखाप्रमुख प्रमोद सांगवेकर यांचे पक्षशिस्त भंग केल्याबाबत ६ वर्षांसाठी निलंबन करीत असल्याची कारवाई शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल व शिवसेना कणकवली तालुका प्रमुख दामोदर सावंत यांनी केली आहे.
शिवसेना नागवे शाखाप्रमुख प्रमोद सांगवेकर यांना या संदर्भात बजावलेल्या पत्रात ते म्हणतात, शिवसेना पक्षाच्यावतीने आपणास कळविण्यात येते की, आपण शिवसेना शाखाप्रमुख या पदावर कार्यरत असताना महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. ही कृती पक्षाच्या धोरणाविरोधात असून ती घोर पक्षशिस्तभंग करणारी आहे.
पक्षाची परवानगी न घेता व वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करून केलेली ही कृती शिवसेनेच्या तत्वांना व शिस्तीला धरून नाही. म्हणूनच, पक्षप्रमुख व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, आपणास दिनांक २७/०१/२०२६ पासून पुढील ६ (सहा) वर्षांच्या कालावधीसाठी शिवसेना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे. निलंबन कालावधीत आपणास पक्षाचे कोणतेही पद, अधिकार, जबाबदारी, पक्षाचे नाव, चिन्ह अथवा कार्य वापरण्याचा अधिकार राहणार नाही, याची नोंद घ्यावी. हा आदेश तात्काळ अंमलात येत आहे. असे नमूद केले आहे.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.