loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरीवली आडिवाडीत शिमगोत्सवाचा जल्लोष; सीमेवर देवपूजा संपन्न, आज पालखी सोहळ्याचा थाट

दापोली (सागर गोवळे) - कोकणी संस्कृतीची परंपरा आणि ग्रामदैवताच्या जयघोषाने बोरीवलीतील आडिवाडी परिसर दुमदुमून गेला आहे. अत्यंत श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या येथील शिमगोत्सवाचा मुख्य टप्पा आजपासून सुरू होत असून, 'खेळे' आज सीमेवरून देवपूजा करून गावात दाखल झाले आहेत. उद्या रात्री होणाऱ्या 'मोठ्या होळी' च्या दुसऱ्या दिवशी देवभेटीच्या पालखी सोहळ्याला वाजतगाजत सुरुवात होणार आहे. परंपरेनुसार, मंदिरातुन सिमेवर खेळे एकत्र जमले. तिथे विधिवत देवपूजा अर्चा करून आणि गाऱ्हाणे घालून उत्सवाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात ग्रामस्थांनी मोठा उत्साह दाखवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्याला मोठी होळी रात्री शुभ मुहूर्तावर 'मोठी होळी' प्रज्वलित केली जाईल. वाईट प्रवृत्तींचा नाश आणि गावाच्या सुखासमाधानासाठी ही होळी पेटवली जाते. यावेळी होळीभोवती फेर धरून पारंपरिक गाणी सादर केली जातील. पालखी सोहळा मोठ्या होळीनंतर पालखी सजवून त्यात ग्रामदैवताची प्रतिष्ठापना केली जाईल. होळीला पालखी प्रदक्षिणा घालेल आणि दुसऱ्या दिवसापासून ही पालखी घरोघरी जाऊन भक्तांना दर्शन देईल. गुलाल-फुलांच्या उधळणीत आणि 'होय महाराजा'च्या जयघोषात हा पालखी सोहळा रंगणार आहे.

टाइम्स स्पेशल

ग्रामस्थांचे मत "आमची आडिवाडीची ही परंपरा पूर्वजांपासून चालत आली आहे. सीमेवरील देवपूजा झाली की खऱ्या अर्थाने शिमग्याचा सण घराघरात पोहोचतो. आता वेध लागले आहेत ते पालखी सोहळ्याचे शिमगोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण आडिवाडीत भक्तिमय आणि आनंदी वातावरण पसरले असून, चाकरमानी देखील या उत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg