loader
Breaking News
Breaking News
Foto

संविधान दिनानिमित्त वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारला भारताचा नकाशा

मालवण (प्रतिनिधी) - भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ आणि संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यातील शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवण करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२६ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा साकारत संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी तब्बल ७० फूट लांबी आणि ६० फूट रुंदीचे भारताचे मानचित्र तयार करून संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांच्या प्रेरणेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी कलाशिक्षक समीर चांदरकर आणि क्रीडा शिक्षक संजय पेंडूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

टाईम्स स्पेशल

यावेळी पर्यवेक्षक महेश भाट तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाला कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर आणि सर्व संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या. मानवी साखळीतून साकारलेल्या भारताच्या नकाशाने विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता, देशप्रेम आणि एकतेचा संदेश प्रभावीपणे दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg