loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये संविधान गौरव दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांच्या रॅलीने शहरात संविधानमय वातावरण!

खेड (प्रतिनिधी) - भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये यांची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी, तसेच नव्या पिढीमध्ये संविधानाविषयी आदर आणि जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने खेड नगर वाचनालयाच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संतोष जेधे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधानाला गोविंद राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर भारतीय संविधान हातात घेऊन खेड शहरातून संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रॅलीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्र येऊन संविधान शपथ घेतली. एल. पी. इंग्लिश स्कूलचे शिक्षक ताबे यांनी संविधानाची शपथ दिली. तसेच एल. पी. इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक भगत यांनी भारतीय संविधानातील नागरिकांचे अधिकार आणि संविधानाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुकादम स्कूल, खेड येथील विद्यार्थ्यांनी केलेली आकर्षक वेशभूषा. त्यांच्या सहभागामुळे खेड शहरामध्ये एक वेगळेच चैतन्य आणि संविधानमय वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमास एल. पी. इंग्लिश स्कूल, श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, मुकादम हायस्कूल तसेच राजू आनंद स्कूल येथील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या शेवटी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे सदस्य गोविंद राठोड यांनी उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले. संविधान हे केवळ पुस्तक नसून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या स्वातंत्र्याचा, समतेचा, बंधुतेचा आणि न्यायाचा आधार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जाणीव निर्माण करणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमधून उद्याचा जागरूक आणि जबाबदार नागरिक घडण्यास निश्चितच मदत होईल, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. खेड नगर वाचनालयाच्या वतीने या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाचे पदाधिकारी व सदस्य यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg