loader
Breaking News
Breaking News
Foto

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी! तुर्भे उड्डाणपूल ३१ मार्च २०२७ पर्यंत बंद; ठाण्याहून वाशी, मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

नवी मुंबई, (प्रतिनिधी) : शीव-पनवेल महामार्गावरील महत्त्वाच्या असलेल्या तुर्भे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ठाण्याकडून वाशी आणि मुंबईकडे जाणारा मार्ग २५ नोव्हेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या चार महिन्यांच्या कालावधीसाठी वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली असून, या काळात पुलाच्या संबंधित भागाचे पाडकाम करून नवीन बांधकाम केले जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या तांत्रिक पाहणीमध्ये या पुलाची संरचनात्मक स्थिती कमकुवत होऊन धोकादायक बनल्याचे निदर्शनास आले होते. वारंवार दुरुस्ती करूनही त्यात अपेक्षित सुधारणा होत नसल्याने, अखेर सार्वजनिक सुरक्षिततेचा विचार करून पुलाच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलाच्या पहिल्या भागाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यातील काम सुरू करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

वाहतूक बंदीच्या कालावधीत हलक्या तसेच जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. वाहनचालकांना आता शिरवणे पूल, एलपी पूल, जुईनगर आणि तुर्भे बाह्य उड्डाणपुलामार्गे प्रवास करावा लागणार आहे. या बदलामुळे पर्यायी मार्गांवर विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करूनच घराबाहेर पडावे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg