loader
Breaking News
Breaking News
Foto

संविधान दिनानिमित्त दापोली भाजपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

संगलट (प्रतिनिधी) - भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आज, २६ नोव्हेंबर रोजी दापोली भारतीय जनता पार्टीच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेने देशाचे संविधान स्वीकारले. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची हमी दिली आहे. लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्याबरोबरच सामाजिक समतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा विचार संविधानाने देशाला दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अथक परिश्रम घेतले. सामाजिक विषमता दूर करून प्रत्येक घटकाला समान हक्क, संधी आणि प्रतिष्ठा मिळावी, यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांचे विचार आणि कार्य आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहेत. यावेळी भाजप नेते व माजी आमदार सूर्यकांत दळवी, पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, तालुकाध्यक्षा तथा नगरसेविका जयाताई साळवी, ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन होडबे, तालुका सरचिटणीस संदीप केळकर, अमोल तांबे, वेल्हाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून भारतीय संविधानातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण होणे, हीच संविधान दिनाची खरी प्रेरणा असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg