loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड होमगार्ड कार्यालय येथे शहीद होमगार्ड मुकेश जाधव यांचा शहीद दिन साजरा

मंडणगड (प्रतिनिधी) : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात प्राणांची आहुती देणारे कीर्तीचक्र विजेते शहीद होमगार्ड मुकेश भिकाजी जाधव यांचा स्मृतीदिन (शहीद दिन) आज २६ नोव्हेंबर रोजी मंडणगड येथील होमगार्ड कार्यालयात अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तसेच मान्यवरांचे उपस्थितीत संविधान दिन देखील साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडणगड नगर पंचायतीचे नगरसेवक आणि आरपीआय नेते आदेश मर्चंडे तसेच मंडणगड तालुका समादेशक पी. डी. मर्चंडे, वरिष्ठ प्लाटून कंमांडर एस. आर. देवरुखकर, पी.एस.मर्चंडे, एस. ई. सासवे, व्हि. बी. बुधले, आर. एस. गोरीवले, ओ. एम. भानत आदी अधिकारी व होमगार्ड जवानांच्या हस्ते शहीद मुकेश भिकाजी जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळून २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी शहीद मुकेश जाधव यांच्या शौर्याला उजाळा दिला. २६ नोव्हेंबर २००८ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे कर्तव्य बजावत असताना, दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी होऊनही त्यांनी शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ’कीर्तीचक्र’ देऊन सन्मानित केले आहे. मंडणगडच्या या सुपुत्राचा पराक्रम सर्व जवानांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या कार्यक्रमाला मंडणगड होमगार्ड पथकाचे अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg