loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन छेडणार्‍या शिवसेना ठाकरे पक्षाच्या ७ पदाधिकार्‍यांविरोधात लांज्यात गुन्हा दाखल

लांजा (संजय साळवी) - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंजणारी येथे अपघातांच्या वाढत्या घटनांविरोधात रास्तारोको आंदोलन छेडणार्‍या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सात पदाधिकार्‍यांविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही महामार्गावर आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी आंजणारी बसस्थानक परिसरात शिवसेनेच्या आंदोलना दरम्यान दुपारी १२.१५ ते १२.२५ या वेळेत रास्ता रोको करण्यात आले. यावेळी पक्षाचे सुमारे १०० ते १२० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलकांनी महामार्गाच्या दोन्ही मार्गिकांवर ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रत्नागिरीचे अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशासह पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) व (३) अन्वये लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याने गुन्हे दाखल केले आहेत.

टाईम्स स्पेशल

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्तात्रय जयाराम कदम, उपजिल्हाप्रमुख रविंद्र भार्गव डोळस, लांजा तालुकाप्रमुख युवराज मारुती हांदे, संगमेश्वर तालुकाप्रमुख नंदादीप ऊर्फ बंड्या नंदकुमार बोरकर, रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत शंकरराव साळुंखे, लांजा उपशहरप्रमुख प्रकाश ऊर्फ बाबू शांताराम गुरव आणि युवासेना लांजा तालुका अधिकारी अभिजित अनिल राजेशिर्के यांचा समावेश आहे. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सात पदाधिकार्‍यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. विलास जाधव हे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg