loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री महाकाली भक्तगण मित्र मंडळ अखिल किर्तनवाडी गुहागरचा २२वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमानी संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - श्री महाकाली भक्तगण मित्र मंडळ अखिल किर्तनवाडी गुहागरचा २२ वर्धापन दिन सोहळा शिवप्रसाद विनायक रेमजे यांच्या निवासस्थानी विविध भक्तिमय कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. श्री महाकाली देवीचे पठण व पुजा-महाकाली होम हवन, रात्रौ किर्तन युवा किर्तनकार - ह.भ.प. वैभव महाराज कदम, चिखली-कदमवाडी यांचे हरिकीर्तन संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवारी सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती, दुपारी हळदीकुंकू व महाप्रसाद, सायं. श्री महाकाली झोलाई महिला प्रासादिक भजन मंडळ अखिल किर्तनवाडी गुहागर बुवा : सौदामिनी रेमजे, पखवाज : शिवप्रसाद रेमजे, रात्रौ संगीत भजनांचा कार्यक्रम, जागर हरिनामाचा, श्री स्वामी समर्थ संगीत साधना-भांडूप मुंबई बुवा : सुशील गोठणकर व श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ दिवा (रायगड-खरसई) बुवा : संतोष शितकर यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी श्री महाकाली भक्तगण मित्र मंडळ अखिल किर्तन वाडीचे अध्यक्ष विनायक धोंडू रेमजे, उपाध्यक्ष हेमंत गणपत निंबरे, श्री महाकाली भक्तगण महिला मंडळ अखिल कीर्तनवाडी अध्यक्ष भागीरथी पांडुरंग अवेरे यांच्यासह सर्व सदस्य व सर्व भक्तगण यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण जिल्ह्याभरातून शेकडो भाविकांसह विविध स्तरातील मान्यवर यांची उपस्थिती होती. श्री महाकाली भक्तगण मित्र मंडळ अखिल किर्तनवाडी गुहागर यांच्यावतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg