loader
Breaking News
Breaking News
Foto

काँग्रेसच्या उपोषणाला मनसेचा जाहीर पाठिंबा; जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांचा प्रशासनासह लोकप्रतिनिधींना जाब!

चिपळूण (प्रतिनिधी) - शहरातील गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप आणि उक्ताड परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या मचूळ पाण्याच्या गंभीर प्रश्नावर काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी जाहीर पाठिंबा दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जितेंद्र चव्हाण यांनी प्रशासनासह संबंधित लोकप्रतिनिधींना जाब विचारत तीव्र संताप व्यक्त केला. गेली तब्बल २५ वर्षे या परिसरातील नागरिक मचूळ पाणी पीत असतील, तर तुम्ही माणसं आहात की जनावरं? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी असलेल्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न इतकी वर्षे प्रलंबित राहणे ही प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधींची कार्यक्षमता दर्शवणारी बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी आता तरी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा असून, नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मनसे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg