संगलट (इक्बाल जमादार) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, आणखी एका भीषण अपघातात ६२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागोठणे हद्दीतील हॉटेल रुचीच्या पुढे भरधाव स्पोर्ट्स मोटारसायकलने महामार्गावरून पायी चालणार्या तुळसाबाई ठमा कोळी यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी एसटी बस आणि स्कूटीच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हा अपघात घडल्याने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण दत्ताराम सुरवसे (वय ३४, रा. बोरिवली) हे एमएच ४७ बीएम ००३३ क्रमांकाची स्पोर्ट्स मोटारसायकल घेऊन मुंबईच्या दिशेकडून गोव्याच्या दिशेने जात होते. यावेळी नागोठणे हद्दीतील हॉटेल रुचीच्या पुढे महामार्गावरून पायी चालत असलेल्या तुळसाबाई कोळी (वय ६२, रा. कोळीवाडा) यांना दुचाकीची जोरदार धडक बसली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कोळी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हेमंत कुथे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, अपघात झालेल्या ठिकाणाजवळ जोगेश्वरीनगर आणि रामनगर या वसाहती असून, येथील नागरिकांसह शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर या मार्गावरून ये-जा करतात. या परिसरात वाहनांची वर्दळ आणि पादचार्यांची रहदारी लक्षात घेता, अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या ठिकाणी मोठे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी जोर धरत असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन संभाव्य अपघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.