loader
Breaking News
Breaking News
Foto

षटकारांची हॅटट्रीक! श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान, जयभैरी नाचणे क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेत रोमांच वाढला

रत्नागिरी, : श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि जयभैरी नाचणे क्रिकेट क्लब आयोजित भव्य नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत दुसर्‍या दिवशीही रंगतदार सामने झाले. क्रिकेट रसिकांनी गुरुवारी झालेल्या दुसर्‍या सामन्यात षटकाराची हॅटट्रीक पाहीली. रत्नागिरीतील प्रमोद महाजन मैदानावर प्रकाशझोतात सुरु असलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ७ सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांवर मात करत राम जानकी गावखडी संघाने स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी पहिला सामना ऑल पटवणे विरुद्ध समृद्धी ११ म्हामूरवाडी या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यामध्ये ऑल परटवणे हा संघ विजयी झाला. त्या विजयी संघामध्ये साहिल मदार याने २ ओवरमध्ये ५ रन देत १ विकेट घेतली. फलंदाजी करताना २७ धावांची खेळी केली. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवसातील दुसरा सामना हा इरा स्पोर्ट पावस विरुद्ध समर्थ रोड लाईन्स घुडेवठार या संघामध्ये झाला. इरा स्पोर्ट्स या संघाने विजय मिळवला. मुनीब कप्तान याला सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याने वैयक्तिक २३ धावा केल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. त्याने षटकारांची हॅटट्रीक नोंदवली. दिवसातील तिसरा सामना फाईट क्लब मिर्‍या विरुद्ध धावजेश्वर नाणीज या दोन संघांमध्ये झाला. त्या सामन्यामध्ये फाईट क्लब मिर्‍या या संघाने विजय प्राप्त केला. त्या संघाचा अवधूत तांडेल याला सामनावीर म्हणून पुरस्कार मिळाला. चौथ्या सामन्यात किलर पावस संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२ धावा केल्या. चॅलेंजर साखरपा संघाने चौथ्या षटकाचा १ चेंडू शिल्लक असतानाच विजयी आव्हान पार केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg