loader
Breaking News
Breaking News
Foto

नामदार उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणकर चाळ येथील मुख्य जलनिस्सारण वाहिनीच्या विकासकामाचे भूमिपूजन

रत्नागिरी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील मालवणकर चाळ येथील मुख्य जलनिस्सारण वाहिनी विकसित करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज उत्साहात पार पडला. या विकासकामासाठी २० लाख ६० हजार ५१ रुपये इतकी अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर करण्यात आली आहे. उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी आपल्या निधीतून ही रक्कम मंजूर करून दिली. याचा पाठपुरावा नगरसेविका सायली विकास पाटील, नगर सेवक विजय खेडेकर यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भूमिपूजन पार पडले यावेळी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेविका सायली पाटील, नगरसेवक विजय खेडेकर, नगरसेवक अभिजित दुडे, उपशहरप्रमुख विकास पाटील, ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे उपस्थित होते. या विकासकामामुळे परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा अधिक सुरळीत होऊन नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg