संगमेश्वर (सत्यवान विचारे) - अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथे धडक कारवाई करत गांजाची बेकायदा लागवड उघडकीस आणली आहे. या कारवाईत तब्बल ५ किलो ५३२ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांची किंमत १ लाख ३८ हजार ३०० रुपये आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अंमली पदार्थांची बेकायदा लागवड करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.०५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पिंपळी बुद्रुक येथील पटेल सॉ मिलच्या आवारात छापा टाकण्यात आला. यावेळी सॉ मिलच्या परिसरात गांजाच्या झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन केले जात असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून गांजाची एकूण ५.५३२ किलो वजनाची झाडे जप्त केली. या झाडांची बाजारभावानुसार किंमत १ लाख ३८ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पटेल सॉ मिलमधील कामगारांच्या निवासासाठी असलेल्या खोलीत राहणारा अभय प्रदीप पांडे (वय २०, मूळ रा. मलपांडे, कापुवाडा, पो. कुचेरा, तहसील मिल्कीपूर, जिल्हा अयोध्या, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजा या अंमली पदार्थाच्या वनस्पतींची विनापरवाना लागवड करून त्यांचे संगोपन केल्याचे कारवाईत उघड झाले आहे. या प्रकरणातील आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चिपळूण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोटकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नांबिकर, वैभव मोरे व चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांनी सहभाग घेतला. अंमली पदार्थांच्या अवैध लागवडीविरोधात पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच गौरवास्पद असून, जिल्ह्यात अशा प्रकारच्या गैरकृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गांजाच्या बेकायदा लागवडीचा प्रकार उघडकीस आला असून, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.