वैभववाडी (प्रतिनिधी) - भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तिथवली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर (प्राथमिक शाळा) आणि श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल (माध्यमिक शाळा) या दोन शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 'भारतीय संविधान समजून घेऊया – जबाबदार नागरिक बनूया!' या संकल्पनेवर आधारित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत MEERA (Modern Education Empowerment And Research Association) चे अध्यक्ष गुलजार काझी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत संविधानाच्या विविध महत्त्वपूर्ण पैलूंना स्पर्श केला.
भारतीय संविधानाची निर्मिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, संविधानाची उद्देशिका, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये, लोकशाही व्यवस्था, सामाजिक न्याय, समानता आणि बंधुता या विषयांची सोप्या व समर्पक उदाहरणांसह माहिती देण्यात आली. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटाला अनुरूप गोष्टी, प्रश्नोत्तरे, विविध कृती आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून संविधानातील मूल्ये समजावून सांगण्यात आली. तर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका, अधिकार व कर्तव्यांचा परस्परसंबंध तसेच अन्यायाविरुद्ध घटनात्मक मार्गाने दाद मागण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
केवळ संविधानाची माहिती देण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता विविध कृती, संवाद आणि सहभागात्मक उपक्रमांच्या माध्यमातून संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत, त्याचबरोबर एक जबाबदार नागरिक म्हणून काही कर्तव्येही सोपविली आहेत. या दोन्हींची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी भविष्यात सुजाण, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनावे, असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. या उपक्रमाला तिथवली केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील, श्री स्वामी विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक सुतार, गणेश, सावंत, पोकळे, सचिन आणि पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवणूक करून लोकशाहीप्रती आदर, सामाजिक बांधिलकी आणि नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.