loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर-बेलोसे महाविद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

दापोली : आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संचलित न. का. वराडकर कला आणि रा. वि. बेलोसे वाणिज्य महाविद्यालय, दापोली येथे २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या कॉरिडॉरमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व भारतीय संविधानाची प्रत ठेवून पूजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कराड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच संविधानाच्या प्रतीचे पूजन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एल. पी. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन NSS विभागप्रमुख डॉ. स्कंधा खेडेकर व विभीषण ढवळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. युवराज आग्रे यांनी केले. संविधानातील मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचे स्मरण करून देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg