loader
Breaking News
Breaking News
Foto

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठवलेला अहवाल चुकीचा, दिशाभूल करणारा - दिपक मोहिते यांचा खरमरीत आक्षेप

खेड (प्रतिनिधी) : कोयना जलविद्युत प्रकल्प (तिसरा टप्पा) प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी सादर केलेला अहवाल पूर्णतः चुकीचा, बेकायदेशीर, दिशाभूल करणारा व अधिकाराबाहेरील असल्याचा खरमरीत आक्षेप सामाजिक कार्यकर्ते तथा कोयना प्रकल्पग्रस्त दिपक भिकाजी मोहिते यांनी घेतला आहे. याबाबत मोहिते यांनी अपर जिल्हाधिकारी, रत्नागिरी भाऊ बाळू गलांडे यांना दिनांक २३/११/२०२६ रोजी सविस्तर पत्र पाठवून अहवाल तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. या पत्राच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, जलसंपदा मंत्री व अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मौजे कोळकेवाडी, ता. चिपळूण येथील कोयना (तिसरा टप्पा) प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांच्या मागण्या थेट राज्य शासन, राज्याचे वरिष्ठ प्रशासन आणि राज्यपाल महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर करण्यात आल्या होत्या. केवळ प्रशासकीय शिष्टाचार व माहितीसाठी या निवेदनांची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांना देण्यात आली होती. असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठवलेला अहवाल हा पूर्णतः चुकीचा, कायद्याची मोडतोड करणारा आणि शासनाची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप मोहिते यांनी केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg