loader
Breaking News
Breaking News
Foto

बेनीखुर्द-खेरवसे ग्रामपंचायतमध्ये संविधानदिन साजरा.

लांजा, दि.२६ नोव्हेंबर (संतोष कांबळे) : तालुक्यातील बेनीखुर्द - खेरवसे ग्रुप ग्रामपंचायत येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संविधान दिनाचा कार्यक्रम बेनीखुर्द व खेरवसे या दोन गावातील महिलांनी मिळून आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनंदा साळुंखे व खेरवसे गावच्या पोलिस पाटील रुपाली कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर पल्लवी चव्हाण, अन्विता बंडबे, मृणाली बंडबे, धनश्री जाधव, वैष्णवी राऊत, नीलांबरी कांबळे ,रुपाली कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. भारतीय संविधान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, नागरिक म्हणून आपली जबाबदारी अशा विविध विषयांवर महिलांनी उत्फुर्तपणे आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनंदा साळुंखे यांनी आपले अध्यक्षीय भाषण करताना ' भारतीय संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण सन्मानाने जगत आहोत 'असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोनिका चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रोशनी बंडबे यांनी केले. कार्यक्रमाला महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) या संस्थेचे फेलो अमर पवार यांचे सहकार्य लाभले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg