loader
Breaking News
Breaking News
Foto

जमीन जागेच्या वादातून शिपोशी जाधववाडीत एकमेकांना मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

लांजा (संजय साळवी) - जमीन जागेच्या वादातून शेजारी शेजारी राहणार्‍या दोघांमध्ये भांडण होऊन एकमेकांना मारहाण शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील शिपोशी जाधववाडी येथे बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत धोंडू जाधव (५५ वर्षे, राहणार शिपोशी जाधववाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर आपला मुलगा श्रवण हा कामाला जात नसल्याने त्याचा राग मनात धरून पत्नी व मुलगा यांना शिवीगाळ करत होते. तसेच संजय शंकर डाफळे याने वडिलांकडून जमीन फसवून घेतली, असे बोलत असताना त्याचा राग मनात येऊन संजय डाफळे याने श्रीकांत जाधव यांना तू भाई झाला आहेस का, असे बोलून त्यांना शिवीगाळ केली दमदाटी करून आपल्या हातातील काठीने त्यांच्या डोक्यावर पाठीवर मारले. तसेच पत्नी श्रावणी ही भांडण सोडवण्यासाठी गेली असता तिचे हाताला पायाला काठी लागून लहान मोठी दुखापती केल्या. या घटनेत दोघे पती-पत्नी जखमी झाले. या मारहाण प्रकरणी श्रीकांत जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी संजय डाफळे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (१), ११५ (२), २५२, ३५१ (२), १३१ प्रमाणे तसेच भा. द. वि. कलम ३२४ ३२३, ५०५, ५०६, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टाईम्स स्पेशल

तर या घटने प्रकरणी संजय शंकर डाफळे (५२ वर्षे, राहणार शिपोशी जाधववाडी) यांनी केलेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत धोंडू जाधव हा बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन संजय डाफळे यांना शिवीगाळी व ठार मारण्याची धमकी देत होता. याबाबत विचारणा केली असता तसेच आपल्या मालकीची गुरे गोठ्यात बांधून घरी जात असताना श्रीकांत जाधव याने संजय डाफळे यांच्या पाठीमागून डोक्यात कोयती मारून दुखापती केल्या. यामध्ये ते जखमी झाले. या घटनेप्रकरणी संजय डाफळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी श्रीकांत जाधव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), १३१ प्रमाणे तसेच भा. द. वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड. कॉन्स्टे. उर्मिला शेडे या करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg