loader
Breaking News
Breaking News
Foto

परराज्यातील १ कोटीं ५४ लाख रुपयांचा अवैध मद्य साठा ठाण्यात हस्तगत, एकाला अटक

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यात जुना मुंबई-पुणे रोड, पारसीक रेतीबंदर, मुंब्रा मार्गे परराज्यातील अवैध मद्यसाठा वाहतूक करण्यात येत असलायच्या माहितीवरून कोकण विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून तब्बल १ कोटी, ५४ लाख, ५१ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून एका आरोपीसह वाहतुकीसाठी वापर केलेले वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी केलेल्या कारवाईत याप्रकरणी पथकाने संशयित आरोपी अभिषेक गणपत जगताप(२५) रा. माणदेवी मंदिराजवळ, माण कुंभारवस्ती, हिंजवडी रोड, पो. इनफोटेक पार्क, (हिंजवडी) ता. मुळशी, जि. पुणे. याला अटक केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परराज्यातील अवैध माद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी माहितीच्या आधारे जुना मुंबई-पुणे रोड, पारसीक रेतीबंदर, मुंब्रा ता. जि. ठाणे परिसरातून गोवा राज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला वरिष्ठ अधिकारी यांना मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून चॉकलेटी व पांढऱ्या पट्टीचा आयशर प्रो. कंपनीचा मॉडेलचा सहाचाकी ट्रक अडवून वाहन चालकाकडे चौकशी आणि तपासणी केल्यानंतर वाहनामध्ये पंखे आणि त्याचे सुटते पार्ट असल्याचे दाखविले. वाहनांची तपासणी केल्यानंतर सामना मागे खाकी रंगाचे बॉक्स असल्याचे दिसून आले. सदर बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये गोवा या राज्यामध्ये निर्मिती केलेले १८० मिली. क्षमतेच्या बनावटी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच त्यावर कोणत्याही प्रकारचे बॅच नं. व कमाल किंमत आढळून आले नाही.

टाईम्स स्पेशल

तरी सदर मद्यसाठा महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की या बॅण्डचे १२३५ बॉक्स मध्ये ५९२८० बाटल्या असा मद्यसाठा आढळून आला. परराज्यातील १ कोटी ५४ लाख ५१ हजार ६०० रुपये किंमतीचे विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या. वाहतुकीसाठी वापरलेला चॉकलेटी व पांढऱ्या पट्टीचा आयशर कंपनीचा ट्रक जप्त केला. आणि आरोपीला अटक केली. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह. आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त, रा.ऊ.शु कोकण विभागाचे प्रदीप पवार, उपअधिक्षक कोकण विभाग ठाणे अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली सदरची कारवाई करण्यात आली. आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg