loader
Breaking News
Breaking News
Foto

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थिनींची 'बिल्डिंग भारत संपर्क इनोव्हेशन बूट कॅम्प'साठी निवड

लवेल - खेड येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (GITM) मधील स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) विभागाच्या तृतीय वर्षात (3rd Year) शिकणाऱ्या ऋचा चव्हाण आणि सावरी कांबळे या दोन विद्यार्थिनींची प्रतिष्ठित 'बिल्डिंग भारत संपर्क इनोव्हेशन बूट कॅम्प' (Building Bharat Sampaark Innovation Boot Camp) साठी निवड झाली आहे. हा उपक्रम १५ ते १७ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयआयटी गांधीनगर (IIT Gandhinagar), गुजरात येथे होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशभरातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या केवळ निवडक ३०० विद्यार्थ्यांनाच या राष्ट्रीय स्तरावरील या बूट कॅम्पमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते. या तीन दिवसीय बूट कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि 'सिव्हिलाथॉन' (Civilathon) सारख्या स्टार्टअप व हॅकाथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. पि.बी. पाटील उप प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. योगेश कुलकर्णी आणि सर्व प्राध्यापक वृंदांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg