चिपळूण(प्रतिनिधी) - नव कोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी. जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) +2 स्तरांतर्गत ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचे आयोजन २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, दातेवाडी, खेडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे ब्रीदवाक्य ‘नशामुक्त व टीबीमुक्त युवा’ असे असून युवकांमध्ये व्यसनमुक्ती, क्षयरोग प्रतिबंध, आरोग्य जागृती, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामविकासाची भावना रुजविण्याचा उद्देश या शिबिरामागे आहे. शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता शिबिराचा उद्घाटन समारंभ होणार असून सायंकाळी ७ ते ८ या वेळेत पत्रकार योगेश बंडागळे यांचे ‘पत्रकारिता : काल, आज आणि उद्या’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. रविवार, २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत प्रा. विनायक बांद्रे यांची सूत्रसंचालन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सायंकाळी ७ ते ८ या वेळेत प्रा. अमित शेवडे हे ‘सायबर फ्रॉड अवेअरनेस’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत ॲड. नयना पवार यांचे कायदेविषयक मार्गदर्शन होणार आहे. तसेच सायंकाळी ७ ते ८ या वेळेत पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुने या ‘विद्यार्थ्यांचे योग्य वर्तन व POCSO कायदा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.मंगळवार, १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त सकाळी ८ वाजता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री. एस. डी. कोळी यांचे क्षयरोग जनजागृतीपर मार्गदर्शन होणार असून सायंकाळी ७ ते ८ या वेळेत प्रा. सुहास वाघमोडे यांचे ‘Decoding the Language of Animals’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. बुधवार, २ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता प्रा. अरुण जाधव हे ‘जलसंवर्धन : आजची बचत, उद्याची सुरक्षितता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ७ वाजता प्रा. डॉ. डी. टी. कदम यांचे ‘राष्ट्रीय सेवा योजनेतील युवकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
गुरुवार, ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता ध्वनीचित्रफितींचे सादरीकरण होणार असून रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता शिबिराचा सांगता समारंभ होणार आहे.शिबिराच्या निमित्ताने २८ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबिर, तर ३० नोव्हेंबर रोजी नेत्रतपासणी शिबिर व लहान मुलांची आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय पथनाट्य सादरीकरण, श्रमदान, बौद्धिक कार्यक्रम, पहाटेचा परिपाठ, महिला सक्षमीकरणविषयक उपक्रम, ग्रामस्वच्छता आणि जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच समाजातील प्रश्न समजून घेऊन सामाजिक परिवर्तनाचे सक्रिय दूत बनावे, आरोग्यदायी व व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा आणि ग्रामीण विकासासाठी योगदान द्यावे, हा या निवासी शिबिराचा मुख्य हेतू असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अविनाश पालशेतकर यांनी दिली.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.