loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यात दारुधंदेवाल्यांना कोणाचेच भय राहिले नाही, कोट गावचे सरपंच संजय पाष्ट्ये यांनी आमसभेत उपस्थित केला प्रश्न

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारू धंदे सुरू आहेत. या धंदेवाल्यांना कोणाचे भय राहिलेले नाही. पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना माहिती दिली गेल्यास कारवाई होण्याआधी त्याबाबतची माहिती दारू धंदेवाल्यांना अगोदर समजते, असे कोट गावचे सरपंच संजय पाष्ट्ये यांनी बुधवारी पार पडलेल्या आमसभेत आमदार किरण सामंत यांच्या समोरच अधिकार्‍यांवर प्रश्न चिन्ह उभे केल्याने सर्वजण आवाक झाले. मात्र आमदार किरण सामंत यांनी या धंदेवल्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचना पोलिस अधिकार्‍यांना दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेले बरेच दिवस लांजा तालुक्यात दारूधंदे राजरोसपणे सुरू आहेत. या धंदवाल्यांना कोणाचेही भय निर्बंध राहिलेले नाही. तालुक्यातील कोट, रिगणे, वेरवली आदीसह अन्य गावात दारूधंदे सुरू आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची विक्री होत आहे. तरूण पिढी या व्यसनाच्या आहारी जाऊन बरबाद होऊ लागली आहेत. या दारूमुळे गावाची शांतता भंग पावत आहे. मात्र या दारूधंदेवाले यांना अभय कोणाचे? असा प्रश्न सरपंच संजय पाष्ट्ये यांनी आमसभेत उपस्थित केला.

टाईम्स स्पेशल

आमसभेत बोलतांना संजय पाष्ट्ये यांनी सांगितले की, या बाबतची माहिती पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना देण्यात आली तर दारू धंदेवाले यांना कारवाई होणार हे आधिच कसे काय कळते? असाही सवालही केला. या प्रश्नामुळे संबंधित अधिकार्‍यांच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आमसभेला उपस्थित सर्वच आवाक झाले. आमदार सामंत यांनी कोणीही धंदेवाले असो तांच्यावर कडक कारवाईच्या सुचना पोलिसांना दिल्या. मात्र यावेळी दारूबंदीचे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी आमसभेला अनुपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg