loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी डॉ. ऋषिकेश केळकर यांची नियुक्ती

रत्नागिरी: सामान्य कार्यकर्त्यापासून संघटनात्मक कामाची सुरुवात करत जनसंपर्काच्या बळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे रत्नागिरीचे युवा नेतृत्व डॉ. ऋषिकेश केळकर यांना भारतीय जनता पक्षाने प्रदेश पातळीवर मोठी संधी दिली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या या निवडीमुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात उत्साहाचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष दिवंगत डॉ. ज. शं. केळकर यांचा सामाजिक व सार्वजनिक कार्याचा वारसा लाभलेल्या डॉ. ऋषिकेश यांनी स्वतःच्या कामातून पक्षात स्थान निर्माण केले आहे. बूथ प्रमुख ते भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे. राजकीय कामासोबतच 'डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल फाउंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील गरजू रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत केंद्र सरकारच्या 'माय भारत' संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा सल्लागार समितीवरही त्यांची निवड झाली आहे.

टाईम्स स्पेशल

नव्या जबाबदारीबद्दल बोलताना, राज्यभरातील डॉक्टर आणि आरोग्यसेवकांना पक्षाशी जोडून वैद्यकीय आघाडी अधिक भक्कम करण्याचा निर्धार डॉ. केळकर यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अनिकेत पटवर्धन यांचे विशेष आभार मानले आहेत. स्थानिक पातळीवरील अनुभव आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर त्यांची ही प्रदेश पातळीवरील वाटचाल यशस्वी ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg