मालवण (प्रतिनिधी) - भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण संस्कार विभागाच्या वतीने गाव शाखा खोटले येथे अंधश्रद्धा निर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये रुजलेल्या विविध अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा आणि गैरसमजुती यांचे निर्मूलन करून नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी विचारसरणी आणि तथागत भगवान बुद्धांच्या प्रज्ञा, शील व करुणेच्या विचारांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या व आदर्शांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, दीप व धूप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिकरीत्या त्रिसरण पंचशील ग्रहण केले. गाव शाखेच्या वतीने वैभव कदम यांनी उपस्थित मान्यवर, उपासक-उपासिका यांचे स्वागत केले. प्रास्ताविक तालुका सरचिटणीस नचिकेत पवार यांनी केले,
या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षक, माजी श्रामणेर, बौद्धाचार्य योगेश वराडकर यांनी प्रात्यक्षिकांसह अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात आपण अनेकदा नकळतपणे अंधश्रद्धांना बळी पडतो. समाजात प्रचलित असलेल्या विविध अंधश्रद्धांचे स्वरूप, त्यामागील गैरसमज आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक व सामाजिक परिणाम त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता तिची सत्यता तपासणे, निरीक्षण करणे आणि बुद्धीच्या कसोटीवर विचार करणे आवश्यक असल्याचे वराडकर यांनी सांगितले. या शिबिराचे मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्गचे सरचिटणीस, केंद्रीय शिक्षक, माजी श्रामणेर, बौद्धाचार्य संजय पेंडुरकर यांनीही अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत विचार मांडले. अंधश्रद्धा ही केवळ वैयक्तिक समस्या नसून ती समाजाच्या प्रगतीतील एक मोठा अडथळा आहे. शिक्षण, जागृती आणि वैचारिक परिवर्तनाच्या माध्यमातूनच समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढता येईल, असे पेंडूरकर यांनी सांगितले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे अध्यक्ष रविकांत कदम यांनी उपक्रमाचे कौतुक केले. तसेच संस्कार विभागाचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी कार्तिक पौर्णिमा आणि तिचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. आभार संस्कार विभागाचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजु, जिल्हा महिला शाखा संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका सरचिटणीस नचिकेत पवार, संस्कार विभाग उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, संस्कार विभाग सचिव मिलिंद पवार, माजी संरक्षण सचिव रमेश कदम, मसदे गाव शाखा अध्यक्ष तानाजी कदम, मालवण तालुका मुंबईचे संस्कार उपाध्यक्ष प्रथमेश वराडकर, वराड गाव शाखेचे उपाध्यक्ष अरविंद वराडकर, माजी श्रामणेर, बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षक शशिकांत कदम, खोटले गाव शाखेचे सचिव वैभव कदम, सिद्धार्थ कदम, मिलिंद कदम, सुनील कदम, दिलीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय उपासक-उपासिका तसेच बालक-बालिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.















































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)

















































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.