loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय एकात्मता शिबिरात हिंदवी किर विशेष पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक हिंदवी किर (प्रथम वर्ष कला) हिला राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सर्वोत्कृष्ट नृत्यांगना म्हणून विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. कुरुक्षेत्र, हरियाणा येथे आयोजित शिबिरात ती मुंबई विद्यापीठ समूहातून ती सहभागी झाली. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले होते. हिंदवी हिला नृत्यांगना पुरस्कार हरियाणा सरकारचे सीएमओ श्री. सैनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र पथकाने सादर केलेल्या नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रमाचे, उत्कृष्ट सादरीकरणाचे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रभावी प्रतिनिधित्व केल्याबद्दल, मुख्य अतिथींनी विशेष कौतुक करत संपूर्ण पथकाचा गौरव केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विविध राज्यांमधील संस्कृतीचे आदान-प्रदान व्हावे, राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट व्हावी आणि तरुणांमध्ये देशभक्ती व बंधुभाव निर्माण व्हावा, या उद्देशाने या राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरासाठी देशभरातून मोजक्याच गुणवान स्वयंसेवकांची निवड करण्यात येते. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या हिंदवीने केलेल्या उत्कृष्ट सामाजिक कार्य, नेतृत्वगुण आणि शिबिराच्या पूर्वतयारीमधील सहभागामुळे तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती. मुंबई विद्यापीठ समन्वयक डॉ. सुशील शिंदे, डॉ. रमेश देवकर, जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे, शिबीर शिक्षक प्रतिनिधी प्रा. आशिष चव्हाण, महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्याचे तिने सांगितले.

टाईम्स स्पेशल

या शिबिरात ऋतिका शिंदे, साक्षी होळकर, वेदांत वकटे, ओम बेलोसे, संकुल कदम या स्वयंसेवकांचेही सहकार्य लाभल्याचे तिने सांगितले. या राष्ट्रीय स्तरावरील यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा आणि महाविद्यालयाचा मान उंचावला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, रासेयो विभागाचे समन्वयक, प्राध्यापक तसेच सहकाऱ्यांनी हिंदवी किर हिचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg