रत्नागिरी, दि. 26 (जिमाका):- छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी रक्त सांडून स्वराज्य आणि गडकिल्ले उभारले, त्या गडांचा मान आणि संविधानाचा सन्मान राखणे, गडांचे संरक्षण व स्वच्छता करणे हे केवळ शासन किंवा प्रशासनाचेच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे व शिवप्रेमींची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांनी केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने किल्ले सुवर्णदुर्ग व गोवा भुईकोट किल्ला येथे संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाला दापोली पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, जि प सदस्य किशोर देसाई, ऐश्वर्या धाडवे, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ, सामाजिक कार्यकर्ते मधूकर दळवी आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती केंद्रे म्हणाल्या, संविधानामुळेच सर्वसामान्य महिलेला जिल्हा परिषदेचा कारभार पाहण्याची व विचार मांडण्याची संधी मिळाली. संविधान दिन केवळ एका दिवसापुरता न ठेवता मनामनात रुजवला पाहिजे. तसेच जलसंधारण, लहान बंधाऱ्यांची उभारणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवीन पिढीशी संवाद साधून इतिहास व संस्कृती जपण्याचे आवाहन त्यांनी केले. सकाळपासून राबविण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमाबद्दल आयोजक, शाहीर, अधिकारी, मान्यवर व नागरिकांचे त्यांनी आभार मानले.पंचायत समिती सभापती श्री राजे म्हणाले, राज्यमंत्री योगेश कदम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राज्यभर राबविला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. गडसंवर्धन आणि संविधानाचा जागर लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवून आगामी उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद सदस्य श्री, देसाई यांनी गडकिल्ल्यांचे जतन, प्लास्टिकमुक्ती आणि संविधानाचे महत्त्व यावर भर दिला. पर्यटकांमुळे किल्ल्यांवर होणारे प्रदूषण रोखण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे सांगत, वाढत्या कॅन्सरसारख्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले. संविधान दिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर पाळला जावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. पंचायत समिती सदस्य श्री शेठ यांनी किल्ले सुवर्णदुर्गच्या ऐतिहासिक व आरमारी वारशाचा उल्लेख करत स्वराज्य, संविधान आणि निसर्ग संवर्धन यांची सांगड घालण्याचे आवाहन केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारलेल्या भारतीय संविधानाने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये दिली. कोकणातील समुद्रकिनारा, डोंगररांगा व जैवविविधता जपण्यासाठी प्लास्टिक प्रदूषण, समुद्रात टाकला जाणारा कचरा, वृक्षतोड आणि जलप्रदूषण रोखून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नागरिकांनी एकत्र येऊन काम करावे, तसेच हा उपक्रम वर्षभर गावे, शाळा व महाविद्यालयांत राबवावा, असे त्यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाकडून सर्वांना संविधान उद्देशिका देण्यात आली. तसेच तिचे यावेळी वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, संविधान उद्देशिका आणि भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकेत कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, आयोजक, शाहीर, अधिकारी आणि नागरिकांचे आभार मानून सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)





















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.