loader
Breaking News
Breaking News
Foto

"बळकट लोकशाहीचा प्राण म्हणजे संविधान", श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात आयोजित संविधान दिन कार्यक्रम उत्साहात

पाचल (सुरेश गुडेकर) - "जगात भारताची लोकशाही बळकट लोकशाही म्हणून ओळखली जाते. विविध भाषा, विविध प्रांत भिन्नभिन्न संस्कृती असे वैविध्य असूनही या साऱ्यांना गुंफून ठेवण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयी बरोबरच मानवी जीवनमूल्यांची जपणूक संविधानामुळे होते. आपल्याला हक्क आणि कर्तव्य संविधानाने दिली आहेत. जगभरात सत्तावणाऱ्या जटील प्रश्नांवर संविधान हेच उत्तर आहे. भारतीय बळकट लोकशाहीचा प्राण म्हणजे संविधान असून या संविधान निर्मितीत सहभागी असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून संविधानाचे विचार घराघरापर्यंत पोहोचवूया", असे आवाहन डॉ. ए. डी. पाटील यांनी केले. ते श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आयोजित संविधान दिन कार्यक्रमात 'संविधान व भारतीय लोकशाही' या विषयावर बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एस. व्ही. निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व संविधानाच्या प्रतीला अभिवादन करून करण्यात आले. तदनंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून प्रा. एस. व्ही. निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. " संविधान निर्मितीचे कार्य खूप मोठे होते. संविधानाने आपणाला अनेक हक्क, अधिकार आणि कर्तव्य दिली आहेत.

टाईम्स स्पेशल

या सर्वाप्रती सजग राहून आपण सर्वांनी भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी संविधानाचा जागर करूया", असे आवाहन आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. पी. एस. मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. व्ही. निंबाळकर यांनी तर आभार डॉ.बी. टी.दाभाडे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg