loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका स्वाती ढोके यांचे निधन

देवगड (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार प्राप्त माजी शिक्षिका देवगड मिठबाव कोंडवाडी येथील जेष्ठ नागरिक स्वाती शिवराम ढोके यांनी दि. २४ नोव्हेंबर भांडुप (पश्चिम) मुंबई येथे उपचार दरम्यान खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुत्यु समयी त्या ८६ वर्षांच्या होत्या. पूर्वाश्रमीच्या सुलभा सिताराम गिरप यांचं शालेय, माध्यमिक, डीए शिक्षण मालवण येथे त्यांनी पूर्ण केले. प्रारंभी मालवण येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून रूजू झाल्या त्यानंतर त्यांनी कुडाळ, सावंतवाडी येथे अध्यापन आणि अध्ययनाचे कार्य केले. त्याच्या कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने त्यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षण हा त्यांचा आवडता विषय होता. प्रत्येक मुला, मुलींना चांगल्या दर्जाचे शिक्षण घ्यावे, असे त्यांचे सांगणे असायचे. त्यांचा स्वभाव लोभसवाणा होता तसेच त्या परोपकारी वृत्तीच्या होत्या त्यांनी माहेर आणि सासरच्या कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पश्चात मुलगा संदिप, तीन विवाहीत कन्या, पुतणे, दिर, जावा, जावई, नातवंडे, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांचे अल्प आजाराने निधन झाल्याने मालवण, देवगड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर भांडुपच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रात मंडळी उपस्थित होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg